ऑन’लाइन’पासूनव्हा सावधान!


333Swapnil.Ghangale @timesinternet.in ‘तुझं काय बाबा, तू रोज तिच्याबरोबर फिरायला जातोस…आम्ही मात्र एकटा जीव सदाशिव…’ असा डायलॉग मारणाऱ्या मित्र-मैत्रिणींवर फारसा विश्वास ठेवू नका. त्यापैकी अनेकजण मोबाइलच्या माध्यमातून मात्र एकाच वेळी अनेकांशी डिजिटली प्रेमात गुंतलेले असू शकतात. हे छुपे रुस्तम प्रेमवीर एकटे दिसत असले, तरी नाक्यावरच्या भाषेत सांगायचं तर त्यांनी ऑनलाइन सेटिंग लावली आहे. याशिवाय खऱ्या आयुष्यात एक जोडीदार असताना, सोशल मीडियातून इतरांवर ‘डोरे’ टाकणारे, प्रेमाच्या आणाभाका घेणारे अनेक प्रेमवीर ऑनलाइनवर आहेत. सोशल मीडियावरील संवादातून डिजिटल रिलेशनशिप तयार होते. आपल्याशी बोलणारं कोणीतरी स्क्रीनच्या पलिकडे आहे याचं मानसिक समाधान जास्त महत्वाचं वाटतं. अशी नाती फक्त डिजीटली फुलतात आणि तिथेच बाय किंवा ब्लॉक करून संपवली जातात. सोशल माध्यमातून एकाहून अधिक डिजिटल जोडीदारांबरोबर प्रेम व्यक्त करणाऱ्यांची संख्या मोठी आहे असं सोशल मीडियातज्‍ज्ञ सांगतात. पण सोशल मीडियावरचा खासगी संवाद पुढे गोत्यात आणणारा ठरु शकतो हे त्यांच्या लक्षात येत नाही. गुप्त, खासगी माहिती समोरच्या व्यक्तीकडे पोहोचल्यावर अनेकांना या रिलेशनशिपमधून बाहेर पडणं कठीण जातं. म्हणूनच पालकांनी आपल्या मुलांकडून असं काही होत असेल, तर वेळीच लक्ष घालणं गरजेचं आहे असं तज्‍ज्ञांचं म्हणणं आहे. सावध राहा… डिजिटल इमेज जपा डिजिटल माध्यमांत एकाहून अधिक जणांशी प्रेम व्यक्त करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अगदी ऑफिस, कॉलेजं इथपासून ते शाळांमध्ये हा डिजिटल रिलेशनशिपचा ट्रेंड दिसून येतोय. याचे जसे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. एकाच वेळी अनेकांबरोबर व्हर्च्युअल प्रेम करणाऱ्यांपासून सावध राहण्याबरोबरच आपण स्वत:ची डिजिटल इमेज आणि खाजगी माहितीचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. – सोनाली पाटणकर, काऊन्सेलर, रिस्पॉन्सिबल नेटिझम

Source

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s